Breaking News

केजरीवाल सरकारवर सीएनजी घोटाळ्याचा कपिल मिश्रा यांचा आरोप

नवी दिल्ली, दि. 03 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुमारे 10 हजार बनावट सीएनजी संच लावल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षातून निलंबित केलेले कपिल मिश्रा यांनी केला आहे. येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
सीएनजीचे बनावट संच लावत केजरीवाल यांनी घोटाळा केल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. दशमेश कंपनीकडून हे संच लावले जात असून यापूर्वी उच्च न्यायालयाने एका बनावट कंपनीबाबत दखल घेत कंपनी बंद करण्याचे निर्देश दिले होते. सीएनजी संच कॅनडातून येतात, अशी चर्चा सर्व ठिकाणी आहे. मात्र, हे संच कॅनडातून येत नाहीत. संबंधित कंपनीच्या कॅनडाच्या पत्त्यावर रेस्टॉरंट आहे. सीएनजीच्या या एका संचाची किंमत 35 हजार असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.