Breaking News

देशात 2016-17 मध्ये चहाच्या उत्पादनात वाढ

कोलकाता, दि. 04 - देशात चहाचे उत्पादन 2016-17 मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 1.41 टक्क्यांनी वाढून 125 कोटी किलो झाले आहे, अशी माहिती वाणिज्य  मंत्रालयाने दिली आहे. गेल्या वर्षी देशभरात 123 कोटी किलो चहाचे उत्पादन झाले होते.
देशात चहा उद्योगात आतापर्यंतची ही सर्वोच्च स्तर आहे. देशात 3.43 टक्क्यांनी चहा उत्पादन वाढले आहे. ही वाढ 3 कोटी 45 लाख किलो इतकी झाली आहे.  यामध्ये पश्‍चिम बंगाल महत्त्वाचा हिस्सेदार आहे. दक्षिण भारतात तामिळनाडू चहाचा प्रमुख उत्पादक आहे. मात्र दक्षिण भारतात चहाच्या उत्पादनात 1 कोटी 72 लाख  किलोंची घट झाली आहे.