जळगावात बेकायदेशीरित्या विक्री केली जाणारी गावठी दारू जप्त
जळगाव, दि. 04 - बेकायदेशीरित्या गावठी दारूची विक्री करताना एकाकडून 1 हजार 560 रूपये किंमतीची सुमारे 26 लिटर दारू पोलिसांनी जप्त केली.
मेस्कोमाता परिसरात गावठी दारूची विक्री केली जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. याप्रकरणी अनिल धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला भारत मगरे (मेस्कोमातानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उमाकांत चौधरी हे करीत आहेत. संशयिताकडून 26 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.