Breaking News

कार्यकर्त्यांने मनाशी खंबीर रहाणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली !

नाशिक, दि. 04 - भाजपाचे दिवंगत लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांना तृतीय स्मृतीदिनानिमित्त भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करुन अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा देतांना भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी मुंडे यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश  टाकला. 
नाशिकच्या तुरुंगात 19 महीने तुरूंगवास भोगणारा हा धाडसी कार्यकर्ता साली तुरुंगवास भोगतो व 95 ला राज्यात सरकार स्थापन करतो या 20 वर्षाच्या काळात  त्यांच्या कामात नियोजन होते. संघर्ष यात्रा काढुन सत्ता परिवर्तन करण्याता सिंहाचा वाटा होता. मुंडे हे कोणा एका समाजाचे नेते नसुन नखशिखांत लोकनेता म्हणुन  मुंडे यांचे नेतृत्व पुढे आले. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन काँग्रेस विरोधी सर्व विचारधारांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यांचे जीवन हे कार्यकर्त्यांना  नेहमीच प्रेरणादायी ठरेल. कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीत मनाशी खंबीर रहाणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली ठरेल असे म्हटले. याप्रसंगी मध्य पश्‍चिम मंडल  अध्यक्ष देवदत्त जोशी , सुजाता करजगीकर, उत्तम उगले, अमित घुगे, पंकज भुजंग ुंडे यांच्या विषयी आपले विचार मांडले. या प्रसंगी भारती बागुल, पुष्पा शर्मा,  रोहीणी नायडु, शैलश जुन्नरे, ड. नितीन ठाकरे, अरुण शेंदुर्णीकर, बापु शिनकर, नंदकुमार देसाई, ड.य साने, वैशाली शहा, मनोरमा पाटील, सोनल दगडे, ऋषिकेश  आहेर, पवन उगलेप्रितम आव्हाड, संतोष फड, कुणाल निफाडकर, विनायक कस्तुरे, किर्तीश जोशी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.