Breaking News

बस आणि दुचाकीच्या धडकेत दोन जण ठार

नांदेड, दि. 12 - बस आणि दुचाकीची धडक झाली या धडकेत दोघे जण ठार झाले असून बसही उलटली. सुदैवाने बसमधील 22 प्रवासी सुखरूप आहेत.
खंडु भीमराव भूरके वय 35 रा करमोडी ता हदगाव, रतन मुंजाजी जवाडे वय 40 रा. कुंभारवाडी ता. कळमनूरी, हे दोघे 26 एबी 1584 दूचाकीवरून जात होते.  बामणी फाटा येथे महाराजस्त्र परिवहन महामंडळाची बस क्रमांक एमएच 26 बीेेएल 2603 ने दुचाकीला धडक दिली. दरम्यान बसला सरळ करताना चालकाचे नियंत्रण  सुटल्याने बस उलटून खड्ड्यात पडली. यावेळी बसखाली चिरडून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. बसमधील सर्वच्या सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र बसच्या  काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.हि बस हदगावहुन नांदेड जात होती.