Breaking News

रामदास कदम यांनी केली खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

लातूर, दि. 12 - खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेला नावे ठेवण्याआधी आपल्या वडिलांना समजून घ्यावे असा सल्ला पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम  यांनी दिला. लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत ते होते. काही दिवसांपूर्वी लातूर भेटीवरून शिवसेनेवर खा. सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. याचा  संदर्भ घेऊन ते बोलत होते. 
कर्जमुक्त होणारच या अभियानासाठी शेतक-यांचे अर्ज भरुन घेतले जात आहेत. आमचे पदाधिकारी शेतक-यांपर्यंत किती पोचले आहेत, अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी  चालू आहे याचीही माहिती घेत आहे अशी माहिती त्यांनी दिली. साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन महाराष्ट्राला भिकेला लावण्याचे काम या पक्षांनी केले. सत्तर  हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. त्यावर अशी यात्रा काढणे ही नौटंकी आहे असा आरोप त्यांनी केला.