संप म्हणजे स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखं: प्रकाश आंबेडकर
अकोला, दि. 02 - शेतकर्यांनी पुकारलेला संप म्हणजे शेतकर्यांनी स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखं आहे. असं मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार हे कारखानदारांचं सरकार होतं. तर भाजपचं सरकार हे व्यावसायिकांचं सरकार आहे. त्यामुळे शेतकरी सरकारपेक्षा ग्राहकाच्या विरोधातील आंदोलन करत आहे. त्यामुळे या संपाला आमचा पाठिंबा नाही. कारण की, शेतकरी या संपामुळे स्वत:च्याच पायावर कुर्हाड मारत आहे. शेतकर्यांना अपेक्षाप्रमाणे हमीभाव मिळत नाही. तो त्यांना मिळाला हवा ही आमची अपेक्षा आहे.’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, आज शेतकरी संपाचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर राज्यातील शेतकर्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. शहरांची नाकाबंदी करुन आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा शेतकर्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजपासून अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसंच महागाईचीही टांगती तलवार शहरवासियांच्या डोक्यावर आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत सात दिवस संप चालूच ठेवण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, साताबारा कोरा करावा अशा शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.