Breaking News

मतदान यंत्रे चाचणीत नवी यंत्रे देण्याचे उत्तराखंड न्यायालयाचे निर्देश

नैनिताल, दि. 03 - निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात फेरफार करून दाखवण्याच्या दिलेल्या आव्हानादरम्यान नवी मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात यावीत, असे निर्देश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिले आहेत. 
निवडणूक आयोगाने दिलेल्या आव्हानादरम्यान मतदानावेळी उपयोगात आणलेली मतदान यंत्रे उपलब्ध करून देऊ नयेत. मतदान यंत्रातील फेरफारीच्या चर्चेदरम्यान निवडणूक आयोगाची विश्‍वासार्हताही महत्वाची असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, निवडणूक आयोगाचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्वीकारले असून आम आदमी पक्षाने यातून काढता पाय घेतला आहे. निवडणूक आयोगाने दिलेले आव्हानाची उद्या चाचणी घेतली जाणार आहे.