रामचंद्र गुहा यांच्या पत्रातील मजकूर फुटला; खेळाडूंवर साधला निशाणा
नवी दिल्ली, दि. 03 - प्रशासकीय समितीमधून राजीनामा देणारे रामचंद्र गुहा यांनी राजीनामा का दिला यासंदर्भातले पत्र उघड झाले आहे. गुहा यांनी समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात रामचंद्र गुहा यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत आपले मत मांडले आहे.
या पत्राद्वारे त्यांना भारतीय क्रिकेटमधील स्टाऱ खेळाडूंना लक्ष्य केले आहे. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मोठ्या खेळाडूंकडे जास्त लक्ष्य देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रशासकीय समिती अनेक मुद्यांवर निर्णय घेण्यास असमर्थ आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
गुहा यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीपासून ते सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यातआलेल्या प्रशासकीय समिती सर्वांवर निशाणा साधला आहे. तसेच गुहा यांनी राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि सुनील गावस्करांवरही निशाणा साधला आहे. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक इंडियन प्रीमियर लीगसाठी आपल्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दिल्ली डेअर डेव्हिल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा ज्युनियर भारतीय संघाचाही प्रशिक्षक आहे. सुनील गावसकर हे खेळाडूंच्या व्यवस्थापकीय कंपनीचे प्रमुख आहेत. तरीही बीसीसीआयने धावत्या समालोचनासाठी त्यांची निवड केली आहे. कसोटी क्रिकेट संघात नसतानाही महेंद्रसिंह धोनीला ‘ए’ श्रेणीमध्ये ठेवले आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला. प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेची कामगिरी चांगली असतानाही, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी त्यांच्यावर वाद निर्माण केला आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
रामचंद्र गुहा यांनी प्रशासकांच्या समितीमधून राजीनामा दिला आहे. हा राजीनामा मी वैयक्तिक कारणामुळे देत आहे, असे गुहा यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.