शेतकरी संपामुळे भाज्या महाग; गृहिणींचे ’बजेट’ कोलमडले
पुणे, दि. 04 - सध्या शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफी या मुद्यांना घेऊन बळीराजाने संपाचे हत्यार उपसले. याचे पडसाद शहरातही उमटले आहेत. शहरातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी होते आहे.
शेतकर्यांच्या या संपाची झळ सर्वसामान्य नागरिकांनाही बसायला सुरुवात झाली आहे. शेतकर्यांच्या संपामुळे बाजारपेठांमधील भाजीपाल्याची आवक घसरली. परिणामी भाजीपाल्याच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. सध्यातरी बाजारपेठांमध्ये भाजीपाला थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र संप कायम राहीला तर नागरिकांचे हाल होणार आहेत. यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी मागणी होते आहे.