दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी भारत-फ्रान्स सहकार्य करणार - पंतप्रधान मोदी
पॅरिस, दि. 04 - दहशतवाद ही सर्वांत मोठी समस्या असून संपूर्ण जग त्याचा सामना करत आहे. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी भारत व फ्रान्स हे दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले. युरोप देशांच्या दौ-यातील शेवटच्या टप्प्यात ते फ्रान्समध्ये होते. तेथे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एमानुएल मॅक्रों यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा झाली.
द्विपक्षीय संबंधांतून दोन्ही देशांतील परस्पर संबंध आणखी दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला. जगभरात वाढत असलेल्या दहशतवादाबाबत दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली. दहशतवादाने केवळ भारत व फ्रान्सला नव्हे तर संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. जगभरातील दहशतवादाची कीड मुळासकट उखडून टाकण्यासाठी एकजूट होण्याची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तंत्रज्ञान, गुंतवणूक, ऊर्जा, शिक्षण व उद्योग क्षेत्रांत दोन्ही देशांतील संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत तत्पर आहे. दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंधही आणखी चांगले होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.