Breaking News

अफगाणिस्तानमध्ये दफनविधीवेळी बॉम्बस्फोट; 12 जण ठार

काबुल, दि. 04 - अफगाणिस्तानमधील खैरखाना परिसरातील एका राजकीय नेत्याच्या मुलाच्या दफनविधीच्यावेळी तीन स्फोट झाले. या स्फोटात जवळपास 12  जण ठार झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
सलीम एझादयार याचा सरकारविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामध्ये मृत्यू झाला होता. त्याच्यासह अन्य चौघांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे  सरकारविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला होता. सलीम एझादयारच्या दफनविधीला अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यासह वरिष्ठ सरकारी  अधिकारीही उपस्थित होते. मात्र बॉम्बस्फोटामध्ये यापैकी कोणालाही काहीही इजा झालेली नाही.
बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 90 जण ठार झाले होते. तर शेकडो जण जखमी झाले होते. 2014 सालानंतर अफगाणिस्तानमध्ये झालेला हा सर्वात भीषण  हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.