Breaking News

तो निर्णय ’पीएमपीएमएल’च्या फायद्याचाच : तुकाराम मुंडे

पुणे, दि. 30 - शाळांना पुरवण्यात येणार्‍या बस भाड्यात करण्यात आलेली वाढ पीएमपीएमएलच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेला हा निर्णय  आहे.पीएमपीच्या हितासाठी, या संस्थेला फायद्यात आणण्याचे माझे प्रयत्न आहेत. पीएमपीएमएल 11 शाळांना या प्रकारे 17 बसच्या माध्यमातून सेवा पुरवते यातील  2 शाळांना ही दारवाढ मान्य आहे. उरलेल्या 9 शाळांच्या बस सेवेसाठी महापालिकेने अनुदान द्यावे याच निर्णय महापालिकेला घ्याचा आहे. त्यामुळे यात पदाधिकारी  आणि माझात कोणताही संघर्षाचा प्रश्‍न उपसत होत नाही. मला प्रामाणिकपणे पीएमपीएमएलच्या विकासासाठी काम करायचं असल्याचे पीएमपीएमएलचे अध्यक्ष  तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केल आहे.
दरवाढीच्या मुद्द्यावरून महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पदाधिकार्‍यांनी मुंढे यांना लक्ष्य केले आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेनेही मुंढे बैठकीसाठी न आल्यामुळे  पीएमपीला निधी देण्याचा ठराव मंजूर केलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर मुंढे म्हणाले की, पीएमपीकडून 11 खासगी शाळांना बस पुरविल्या जातात. त्यातील दोन शाळांनी  दरवाढ मान्य केली असून, त्यांच्या बस सुरू आहेत. नऊ शाळांच्या 17 बसचा प्रश्‍न आहे, त्यासाठी महापालिकेने अनुदान दिल्यास त्यांनाही सवलतीमध्ये बस पुरविणे  शक्य आहे.’’पीएमपीकडून महापालिकेच्या 17 शाळांना 33 बस, विशेष मुलांच्या सात संस्थांना नऊ बस नियमितपणे पुरविल्या जात आहेत, असेही त्यांनी निदर्शनास  आणले. शालेय बस दरवाढीचा निर्णय हा यापूर्वीही पीएमपीचे अध्यक्ष घेत होते, आताही मी निर्णय घेतला तर बिघडले कोठे? दैनंदिन कामकाज पीएमपीचे अध्यक्षच  करतात. दोन्ही महापालिकांच्या पदाधिकार्‍यांना हवी असलेली माहिती पुरविली आहे. आता त्यांनी अनुदान दिले, तरच सवलत देता येईल. तसेच, शालेय विद्यार्थ्यांना  सवलतीमधील पासची सुविधा कायम ठेवली आहे. आपल्याला पीएमपीमध्ये सुधारणा करायची आहे, हे लक्षात घ्यायला हवे, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.