शेतकरी संपाला विरोध करणार्या कर्म दरिद्यांनो! चौकटीत रहा...
दि. 03, मे - शेतकर्यांच्या संपावर शेलक्या भाषेत टिका करणार्या कर्म दरिंद्यांनो! शेतकरी उध्वस्त झाला तर तुमच्या ताटात काय वाढून येईल? सकाळ संध्याकाळ तिन्ही प्रहार तुम्ही जे चेंदता ते शेतकरी पिकवतो, बरं का! फ्रूट सलाड बनविण्यासाठी वापरता ते फळंही शेतकर्याच्याच बांधावरचे.. आणि हो जेवणानंतर ताक अन् दुध हवं आसतां ना तुम्हाला ते देखिल शेतकर्याच्याच गोठ्यातून येतं. बाटली नाही देत दुध. शेतकर्याला करबुडवा, फुकट्या अशी विशेषणे लावून आपली प्रज्ञावंत पंडीत गीरीचे प्रदर्शन करू नका...दोन दिवसापासून सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे सरकार हवालदिल होण्याआधीच सरकारचे भाट प्रचंड अस्वस्थ झाल्याचे चित्र सोशल मिडियावर सुरू असलेल्या विद्वत्तापुर्ण प्रतिक्रियामधून दिसत आहे.आपली विद्वत्ता पाजळवतांना अनेकांनी जावईशोध लावले आहेत. या मंडळींनी आपल्या बौध्दिक कुवतीचे जे दाखले दिलेत ते पाहील्या नंतर नरेंद्र मोदी यांनी या मंडळींना नीती आयोगावर घ्यायला हवे निदान फडणवीस यांनी तरी त्यांच्या बुध्दीची किव करून महाराष्ट्राचे आर्थिक नियोजन या मंडळींकडे सोपवायला हरकत नाही.
म्हणे शेतकरी फुकट्या आहे, करबुडव्या आहे. आम्ही कर भरतो ते कर्जमाफीसाठी नाही. या प्रतिक्रिया वाचल्यानंतर या आवलादी आपल्या माता पित्यांशीही कितपत प्रामाणिक असतील याविषयी शंकाच आहे. एखादं जनावर भाकड झाल्यानंतर मालकाच्या दृष्टीने त्याचा साभांळ मालकाच्या दृष्टीने अडचणीचे ठरते. या जातकुळीच्या नजरेत माता पिताही त्याच रांगेत असावेत. वास्तविक ही मंडळी सकाळ संध्याकाळ जे खातात ते शेतकर्याने घाम गाळून पिकवलेले असते, त्यासाठी त्याने केलेले कष्ट त्याने सोसलेल्या हालअपेष्टा या सार्या गोष्टी ज्ञात असूनही केवळ सरकारची भाटगीरी करण्याची उठाठेव ही मंडळी करीत आहेत
शेतकरी कर भरीत नाही असा बिनबुडाचा आरोप करणारे स्वतः करदाता आहेत का? अगदी प्रामाणिकपणे रूपया न चोरता कर भरला आहे का?अरे हरामखोरांनो शेतकर्याविषयी पुर्वग्रह, असु या ठेवून बोलू नका. जगाच्या पाठीवर सर्वात निष्पाप आणि प्रामाणिक करदाता फक्त शेतकरी आहे.
शेतसारा, शिक्षण कर, कृषी उत्पन्न बाजार समिती सेस, ऊसावर खरेदी कर, ऊसाच्या मळीवर एक्साईज
अशा विविध कराचे 5000 कोटी सरकारी तिजोरित शेतकरी जमा करतो. याऊलट अनेक चोर लफंगे. महाभाग उद्योजक, व्यापारी कर चुकविण्याचे मार्ग अवलंबतात. मल्ल्या 9000 कोटी बुडवून परदेशात तुमच्या छाताडावर नाचतो. 50 उद्योगपतींचे 5लाख कोटीचे कर्ज माफ होते. तेव्हा का बसते तुमची दातखीळ. मग नैसर्गिक आपत्तीमुळे, हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्याने तोट्यात जाणार्या, कर्जबाजारी होवून आत्महत्या करणार्या शेतकर्यांना कर्जमाफी केली तर तुमच पोट डचडच करत?. खुल्या बाजारात उत्पादकांना निर्माण केलेल्या वस्तूची किंमत उत्पादक ठरवतो. ज्या किंमतीला नोकरदार, व्यापारी, उद्योजक आणि संपावर प्रतिक्रिया देणारे विद्वान तो माल खरेदी करतात त्याच किंमतीत शेतकरीही विकत घेतो. याउलट माल शेतकरी पिकवतो, किंमत सरकार ठरवते, त्यातही तुमची ती किंमत द्यायची तुमची औकात नाही शेतमाल खरेदी करतांना बार्गेनींग करता? आले शेतकर्यांना अक्कल शिकवायला.शेतकर्याने ठरवल तर काय होऊ शकतं याची प्रचिती पहिल्याच दिवशी तुमची घसरलेली जीभ सांगते, तेंव्हा आपल्या चौकटीत रहा. सरकारने हायर केलेल्या सोशल मिडीया एजन्सीच्या भिंतीआड राहून शेतकर्यावर चिखलफेक करू नका.