Breaking News

शेतकर्‍यांच्या मरणयातना...

दि. 03, मे - शेतकर्‍यांच्या संपावर देखील राजकारण करणारी औलाद या महाराष्ट्रात वावरते, याचेच आश्‍चर्य वाटायला नको. निदान खाल्लेया अन्नाशी तरी बेईमानी करू नये असे म्हणतात, मग मेच अन्न खाऊ घालणार्‍या अन्नदात्यांशीतरी बेईमांनी कशासाठी.शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर वाचा फोडण्याचा आव आणणार्‍या संघटन आणि पक्ष शेतकरी रत्यावर उतरल्यावर नाहीसा झाला. किती पक्षाचे कार्यकर्ते शेतकर्‍यांसोबत रत्यावर उतरले. शेतकर्‍यांसाठी सत्ता सोडण्याचा दावा करणारा शिवसेना पक्ष तर या संपात कुठैच दिसला नाही. त्याची शेतकर्‍यांविषयीची डरकाळी बाहेर आलीच नाही. शेतकरी आज सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. तो रसत्यावर आपला रोष, संताप व्यक्त करत आहे. त्याला कोणत्याच राजकीय पक्षांची, संघटनांची गरज नाही. शेतकर्‍यांप्रतीची सरकारची संवेदनशीलता संपली की काय? असा प्रश्‍न उभा आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी बापाला रस्त्यावर आंदोलन करतांना आम्हाला काहीच कसे वाटत नाही. शेतकर्‍यांचे कर्जमुक्तीचा मुद्दा आहे, हमीभावाचा मुद्दा आहे. मात्र या प्रश्‍नांबरोबर शेतकर्‍यांनी यापुढे कधीही संप करू नये, रत्यावर उतरू नये, म्हणून शेतकर्‍याची परिस्थिती कशी सुधारता येईल यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. शेतकरी संपावर गेला तर ही, ही कल्पनाच करवत नाही. कारण शेतकरी हा अन्नदाता, जगाचा पोशिंदा, पंरतू आज तोच उपाशी आहे. शेतकरी हा ढोरमेहनत करतो, कष्ट्र उपसतो, आणि त्याचा नफा मात्र दुसर्‍यांना मिळतो अशी आजपर्यंतची परिस्थिती. शेतकर्‍यांना निसर्ग आणि व्यापारी-दलाल शेतकर्‍यांना छळणारा प्रश्‍न म्हणजे आपल्या उत्पादनाला मिळणारा भाव. कोणत्याही शेतकर्‍याला त्याच्या घामाचा पुरेसा मोबदला मिळत नाही. तो मिळवा यासाठी कधी प्रयत्न करण्यात आले नाही. केले ते तोकडे निर्णय घेवून पुढे हे निर्णय शेतकर्‍यांवरच कसे उलटतील याची मात्र पुरेपुर दक्षता घेण्यात आली आहे. शेतकर्‍याला बाजारामधील गणित कळत नाही, त्याला कष्ट्र उपसावे, शेती पिकवावी, आणि उत्पन्न काढावे इतकेच त्याला कळते. मात्र आपल्या कष्ट्राला चार पैका हातात यावा, कारण ही वर्षभराचे कष्ट्र असतात. मात्र त्याची ही अपेक्षा हजारो वर्षापासून फोल ठरत आली आहे. शेतकरी आणि उपभोक्ता यांच्यात उभ्या असलेल्या दलालांच्या साखळीचा प्रभाव कमी करता आला, तर शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. मात्र हे दलाल शेतकर्‍यांचा काही पिच्छा सोडवत नाही. कारण, या साखळीमुळेच शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचा भाव कमी मिळतो आणि ग्राहकांनाही तो माल महाग मिळतो. ही साखळी शेतकरी आणि ग्राहक या दोघांचीही लूट करीत असते. ही लूट थांबवण्याचा एक उपाय म्हणजे शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत नेऊन पोहोचवणे. मात्र आजमितीस बाजारातील स्थिती पाहता हा उपाय यशस्वी ठरेल का ? यावर नियत्रंण राहणार आहे का ? की आणखी दलालांचा सुळसुळाट सुटणार. अर्थात ही पर्यायी व्यवस्था कितपत यशस्वी होते हे महत्वाचे.