Breaking News

पारपत्र हिंदी व इंग्रजी दोन भाषांमध्ये मिळणार - सुषमा स्वराज


नवी दिल्ली, दि. 24 - पारपत्र यापुढे हिंदी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध करून देणार , अशी घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज येथे केली.  याशिवाय आठ वर्षांपेक्षा कमी व 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पारपत्र तयार करण्यासाठीचे शुल्क 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचेही स्वराज यांनी सांगितले.
पारपत्र कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एका टपाल तिकिटाचे लोकार्पणही करण्यात आले. याशिवाय जुने नियम रद्द करण्यात आले. नव्या नियमात पारपत्र  नियम 1980 मध्ये बदल करण्यात आले आहेत. जुन्या नियमानुसार, 26 जानेवारी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्यांना पारपत्र बनवण्यासाठी पुन्हा जन्माचा दाखला  तयार करावा लागणार आहे. मात्र आता नव्या नियमांनुसार कागदी कार्यवाही कमी होणार आहे. आता साधू किंवा संन्याशाला त्याच्या आई-वडिलांच्या नावाच्या जागी  त्यांच्या गुरुंचे नावही लिहिता येणार आहे. या आधी ही सुविधा नव्हती. ज्या दाम्पत्यांनी घटस्फोट घेतला असेल, त्या पती-पत्नीला त्यांचे नाव लिहिण्याचीही  आवश्यकता असणार नाही.