न्यायधिशांच्या पत्नीची पर्स चोरटयांनी पळवली
औंरगाबाद, दि. 06 - सिल्लोड बसस्थानकावर चोरटयांचा सुळसुळाट वाढला असून आज त्याचा फटका न्यायधिशांच्या पत्नील बसला त्यांची पर्स चोरटयांनी पळवली, पर्समध्ये दागिने होते.
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पाचोरा येथे कार्यरत असलेले न्यायाधीश मोहमंद ताहेर बिलाल हे पत्नी सोबत नांदेड येथे गेले होते. पाचोरा येथे परत जात असताना ते सिल्लोड बस्थानकावर थांबले होते. पहुर जाण्यासाठी ते व त्यांची पत्नी जळगाव बसमध्ये चढत असताना त्यांच्या पत्नीजवळ पिशवित ठेवलेली पर्स चोरट्यानी पळवली.चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच बसमधुन उतरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. चोरी गेलेल्या पर्स मध्ये 45हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठन, 20 हजार रूपयांच्या सोन्याच्या वाळ्या, 15 हजारांच्या 2 अंगठ्या, चांदीची चैन, मोबाइल, रोख 700 रूपये असे 84 हजार रुपयांचा ऐवज होता. या बसस्थानकावर लुटालुटीच्या घटना ब-याच घडल्या आहेत.