Breaking News

जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी आ.अब्दुल सत्तार यांची कसून चौकशी

औरंगाबाद, दि. 12 - जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी आ.अब्दुल सत्तार यांची आर्थिक गुन्हे शाखेने दीड तास चौकशी केली. जिल्हा बँक अर्थिक घोटाळा प्रकरणी  गेल्या आठवडयात बॅकेच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल करूनही चौकशीसाठी मंडळी पोलिसांना भेटत नव्हती. त्यामुळे त्यांना आता  अटक होण्याची शक्यता होती. या भितीपोटी कॉग्रेसचे नेते व या भ्रष्टाचाराचे मुख्य आरोपी अब्दुल सत्तार यांनी पोलिस मुख्यालयात अर्थिक गुन्हे शाखेत हजेरी  लावली. पोलिसांनी त्यांची तब्बल दीड तास बंद खोलीत चौकशी केली.