Breaking News

पोलिसांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा!

बुलडाणा, दि. 29 -  चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे ईदनिमित्त अंढेरा पोलिस व हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा दिल्या. हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मेरा खुर्द येथील ग्रामस्थांचे एकमेकांवरील असलेले प्रेमभाव हे नेहमीच दिवाळी आणि ईद निमित्त पहायला मिळते. 26 जून रोजी मुस्लिम बांधवाच्या पवित्र ईद निमित्त सकाळी 10 वाजता नमाजनंतर आढेरा पोलीस स्टेशनचे पीएसआय संतोष जवंजाळ, पोलीस शिपाई संदीप पाटील, पत्रकार तथा पंचायत समिती सदस्य उध्दव थुट्टे पाटील,  प्रभाकर काळे, रुपेश पडघान, माजी सरपंच ज्ञानेश्‍वर भुसारी, शिवसेनेचे सर्जेराव गवई, सरपंच प्रल्हाद अवचार, यांच्यासह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. रियाज देशमुख हुसेनखॉ, सामा ईस्तियाक अहेमद, अनिसखॉ सांडु शहा, आकिल अहेमद,  दिपक शिंगणे, फारुक सेठ, संजय चेके पाटील, बाळु वराडे, सुधाकर भुसारी यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.