दै.लोकमंथन कार्यालयात शाहू महाराजांना अभिवादन
बुलडाणा, दि. 27 - येथील दैनिक लोकमंथन कार्यालयात 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रिपाइं(आठवले गट) राज्य सरचिटणीस बाबासाहेब जाधव, दैनिक लोकमंथनचे आवृत्ती प्रमुख गणेश सोनुने, पुरुषोत्तम बोर्डे, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष के.एम.वैरी, जिल्हा उपाध्यक्ष सचिन चंद्रे, किशोर जाधव, ग्रामीण बँकेचे मॅनेजर गजभिये, राजू गवई आदींची उपस्थिती होती.
