पाकिस्तानचा अब्दुल रझाक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
लाहोर, दि. 03 - पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात माहिती दिली. प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी निवृत्त व्हावेच लागते. मी निवृत्त होण्याची ही योग्य वेळ आहे. खरे पाहता निवृत्तीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे. कारण गेले 3-4 वर्षे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलो नाही आणि त्यामुळे आता पुनरागमन करणे खूप कठीण आहे, असे रझाक म्हणाला.
मी संघात असतानाचे माझे सहकारी शाहीद आफ्रिदी, मिस्बाह उल हक, युनिस खान आणि मोहम्मद युसुफ हेदेखील निवृत्त झाले आहेत आणि आता माझीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द संपवण्याची वेळ आली आहे, असे सांगत रझाकने निवृत्तीची घोषणा केली. रझाक 2013मध्ये आफ्रिकेविरूद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रझाकने 46 कसोटी सामन्यात 1946 धावा करत 100 बळी टिपले, तर 265 एकदिवसीय सामन्यात 5080 धावा करून 269 बळी टिपले. तसेच, 32 टी20 सामन्यात 393 धावांसह 20 गडी बाद केले.