पुणे मेट्रोला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न
पुणे, दि. 07 - पुणे मेट्रोला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून पाणी, हवा, माती आणि एकूणच पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता मेट्रो प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोचा पूर्ण कल सौरऊर्जेवर असून जास्तीत जास्त पर्यावरण पूरक बनविण्याचा मानस असल्याचे पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दीक्षित बोलत होते. यावेळी महामेट्रोच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम्, महामेट्रोच्या सल्लागार समितीचे शशिकांत लिमये, पिंपरी-चिंचवड न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथोरिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश खडके आदी उपस्थित होते.पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, पुणे मेट्रोला पर्यावरण पूरक बनविण्यासाठी सौरऊर्जा अतिशय महत्वाचा घटक आहे. हवा, पाणी, ध्वनी यांचे प्रदूषण अत्यंत कमी किंवा शून्य प्रदूषण करण्यात येणार आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करून पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पासाठी एखाद्या झाडाला तोडावे लागत असेल तर ते झाड न तोडता त्याचे स्थानांतरण करण्यात येईल आणि स्थानांतरित केलेल्या प्रत्येक झाडामागे दहा झाडे लावली जाणार आहेत. पुणे मेट्रोच्या कामादरम्यान डीपीआर प्रमाणे 685 झाडे तोडावी लागणार असून महामेट्रोच्या वतीने नजीकच्या भविष्यात तब्बल 7 हजार वृक्षांचे रोपण होणार असून पुणे मेट्रोच्या ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ अंतर्गत ही वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार आहे. महामेट्रोच्या वतीने आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील सेक्टर 29 येथील पाच एकर जागेत वृक्षारोपण करण्यात आले.यामुळे केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील 137 टन कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. पुणे मेट्रो नियोजनापासूनच पर्यावरणपूरक अपारंपारिक उर्जेच्या वापरावर भर देणार आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 65 टक्के उर्जा ही सौर ऊर्जेद्वारे मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पुणे मेट्रो सोलर पॅनेलचा परिणामकारक वापर करेल. पहिल्या टप्प्यात त्यामुळे 17 ते 18 मेगावॉट इतकी वीज सौर उर्जेच्या माध्यमातून मिळेल. अशा पद्धतीने पर्यावरणाचे संवर्धन करणारे नागपूर आणि पुणे मेट्रो हे देशातील उल्लेखनीय प्रकल्प असतील अशी आमची खात्री आहे.
डॉ. ब्रिजेश दिक्षीत यांच्या हस्ते ‘सोलर पल्स वन’ या बॅटरीवर चालणा-या प्रातिनिधिक फीडर कारचे अनावरण देखील करण्यात आले. याविषयीची अधिक माहिती देताना डॉ. दिक्षित म्हणाले की, सोलर पल्स वन ही फीडर सेवा देणारी कार असून 81 किमी प्रती तास या वेगाने धावू शकणार आहे. यासाठी या कारची बॅटरी पाच तास सौरउर्जेवर चार्ज करावी लागणार असून कारच्या छतावर पीव्ही सेल्स बसविण्यात आले आहेत. या फीडर कारची बॅटरी ही सौर शक्ती वापरून चार्ज करता येते. अशा प्रकारच्या गाड्या पुणे मेट्रोला लागणा-या फीडर सेवेसाठी वापरण्याची योजना आहे. पुणे मेट्रो एकूण 31 किलोमीटरची असून ती दोन मार्गांवर धावणार आहे. पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट असा आहे. या मार्गावर एकूण 14 स्टेशन आहेत. पहिल्या मार्गाचे अंतर एकूण 16.5 किलोमीटर असून त्यापैकी 11.5 किलोमीटर जमिनीवरून तर 5 किलोमीटर भूयारी मार्गावरून मेट्रो धावणार आहे. दुसरा मार्ग वनाझ ते रामवाडी असा आहे. या मार्गावर एकूण 16 स्टेशन आहेत. हा मार्ग एकूण 14.5 किलोमीटरचा असून तो संपूर्ण जमिनीवरून आहे. तसेच मुठा नदीच्या पात्रातून 1.7 किलोमीटरचा प्रवास पुणे मेट्रो करणार असल्याचेही दीक्षित यांनी सांगितले.