Breaking News

पहिल्याच पावसाने मनपाचे पितळ पाडले उघडे

। पावसाच्या सरी येताच विजेचा लपंडाव झाला सुरु

अहमदनगर, दि. 05 - सलग तिसर्‍या दिवशीच्या पावसाने शहरातील रस्त्यांची वाट लावली असुन अनेक ठिकाणी मनपाने केलल्या कामांचे पितळ उघडे पडले आहे. तर दुसर्‍या बाजुला शहरातील विजेचा लपंडाव सुरु झाला असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.  शहरातील सलग तिन दिवसांच्या पावसाने शहरातील रस्त्यांना तलावाचे रुप आले असून अनेक ठिकाणी पदचार्‍यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक ठिकाणी डबके साचले असुन काही ठिकाणी नालीचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने  नागरीकांची तारंबळ उडाली आहे.
शहरातील अनेक भागत पावसाने थैमान घातल्याने त्रिधातिपीट उडाली.आहे. अनेक भागामध्ये नाल्याचे पाणी आल्याने रस्त्यावर पाण्याचे डपके साचलेले रविवारी दिसत होते. नाल्यांची साफसफाई मनपाने केली असल्याचा दावा केला असला तरी आता मनपाने केलेली साफसफाईचे काम कोणत्या पध्दतीचे झाले आहे हे सर्वांनाच पहावयास मिळाले आहे. विविध ठिकाणी शहरातील भागामध्ये नाल्यामंधील पाणी रस्त्यावर आल्याने नागरीकांना चालणे अवघड होत होते. शहरातील काही भागात पाण्याचे डबके साचल्याने पाई चालणार्‍यांना मोठी कसरत करावी लागली. तसेच थोड्याशा पावसाने अनेक ठिकाणी विजचा खेळखंडोबा झाले असल्याचे चित्र होते. काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या तुटल्याने अनेक भागात विज गायप झाली होती.