घरकुल योजनेतील पात्र लाभार्थांनाच लाभ द्या!
बुलडाणा, दि. 08 - देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे नागनगाव येथील इंदिरा आवास योजनेअंतर्गत सर्वे करून अपात्र लाभार्थांना घरकुलयोजनेचा लाभ देवून पात्र लाभार्थाना डावल्याप्रकरणी युवक कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष खंडू मुंढे यांनी तहसीलदार, बिडियो, यांच्याकडे 6 जून रोजी लेखी तक्रार दिली आहे.
सदर तक्रारीत म्हटले आहे की, खरोखर ज्या नागरिकांना राहण्यासाठी घर नाही अशा खर्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच ज्यांना आगोदरपासून राहण्यासाठी पक्के घरे आहेत, अशा अपात्र धनदांडग्या लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सदर घरकूल योजनेचा बोगस सर्वे करणार्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर कार्यवाही करावी व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा. अन्यथा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असाही इशारा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष खंडू मुंढे यांनी दिला आहे.