Breaking News

मागासवर्गीयांच्या शैक्षणिक योजना पूर्ववत कराव्यात!

बुलडाणा, दि. 08 - आदिवासीच्या मुलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पहिली ते      पाचवी पर्यंत इंग्रजी शिक्षणाची सोय 2010 मध्ये  शासनातर्फे सुरू करण्यात आली परंतु     अचानक आता ती बंद करून केवळ पहिली ते दुसरीच्या मुलांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत ती योजना पूर्ववत सुरू ठेवून त्याचबरोबर राज्यातीलच नव्हे तर देशभरातील इतरही मागासवर्गीयांच्या त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता सुरू केलेल्या सर्व योजना शैक्षणिकच नव्हे तर इतरही सर्व क्षेत्रात पूर्ववत सुरू ठेवाव्यात यासाठी अ‍ॅड.विजयकुमार कस्तुरे यांचे नेतृत्वात चिखली येथील बहुतांश वकीलांनी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना, तहसीलदार चिखली यांचेमार्फत 2 जून रोजी निवेदन दिले आहे.
शासनाने यावर त्वरीत निर्णय घेवून योजना बंद न करता पूर्ववत सुरू कराव्यात अशी विनंतीवजा मागणी केली आहे. सदर निवेदन देतेवेळी अ‍ॅड.रेखा हणमंते, अ‍ॅड.विजय वानखेडे, अ‍ॅड.सुलभा साळवे, अ‍ॅड.डी.व्ही. पवार, अ‍ॅड.दयानंद जाधव, अ‍ॅड.आर.टी.पवार, अ‍ॅड.विणकर, अ‍ॅड.विजय सरदार, अ‍ॅड.सुनील अवसरमोल, अ‍ॅड.मघाडे, अ‍ॅड. मोतीसिंग काकडे, अ‍ॅड.सी.पी.इंगळे, अ‍ॅड.रूचिता जाधव, अ‍ॅड. सोळंकी, अ‍ॅड.शाकीर, अ‍ॅड.अरूण गवई, अ‍ॅड.व्ही.बी.राऊत, अ‍ॅड.एन्डाईत, अ‍ॅड.एस.बी.जाधव यांच्यासह बहुसंख्य नागरिक  उपस्थित होते.