Breaking News

वक्फ कार्यालयासमोर जमीन कसणारे शेतकरी सोमवारी आंदोलन करणार


औरंग
बाद,दि. 11 : राज्यात वक्फ बोर्डाची सुमारे एक लाख एकर शेतजमीन असून त्यापैकी बहुतांश जमीन कोरडवाहू, पडिक आहे. ही जमीन कसणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. वक्फ बोर्डातर्फे शेती विकास प्राधिकरण स्थापन करून त्यांच्यामार्फत प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी आहे. या मागणीसाठी वक्फ शेतजमीन शेतकरी संघातर्फे 12 जून रोजी पानचक्की येथील वक्फ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील शेतकर्‍यांनी आपल्या न्याय हक्कासाठी
नुकताच संप पुकारला होता. या संपाला वक्फ शेतजमीन शेतकरी संघाने पाठिंबा दिला होता. शासनाकडून शेतकर्‍यांसाठी घेण्यात येणार्‍या निणर्याचा लाभ वक्फच्या शेतजमीनधारकांना व्हावा, या शेतकर्यांनाही व्हावा. तसेच वक्फ शेतीचा शेतसारा व वक्फ फंड, मुतवल्ली या ठिकाणी कर द्यावा लागत आहे. वक्फ बोर्डाची शेती कोरडवाहू व नापिक आहे. यामुळे वक्फ फंडाची रक्कम शासनाने वक्फ बोर्डाकडे वर्ग करावी, थकबाकीतून शेतकर्यांना मुक्त करावे, एक लाख एकर जमिनीच्या विकासासाठी विकास व
जलसंधारण प्राधिकरणाची स्थापना करावी, या कार्यालयाचा खर्च शासनाने करावा, कृषी विकासासाठी नवीन कृषी व सिंचन योजना राबविण्यासाठी निधी द्यावा, आदी मागण्या आहेत. हे आंदोलन वक्फ बोर्डाच्या पानचक्की येथील कार्यालयासमोर करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे यू. आ. सिद्दिकी यांनी दिली.