Breaking News

पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा - हर्षवर्धन

नवी दिल्ली, दि. 05 - पर्यावरणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लोक पुढे सरसावले नाहीत तर पॅरिसमध्ये झालेल्या बैठकीसारखी बैठक अथवा  कोणताही कायदा पर्यावरणाचे रक्षण करू शकणार नाही, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे . जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात  आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नागरिक जर पर्यावरणासाठी आपल्यात काही बदल करणार नसतील, पर्यावरणपुरक जीवनशैली आचरणार नसतील तर पर्यावरण दिवस साजरा करण्यात काहीच अर्थ  नसल्याचे ते म्हणाले. पर्यावरण व वन मंत्रालयाची भूमिका केवळ लोकांच्या सहभागातून पृथ्वीच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलणा-याची असायला हवी, असेही  ते म्हणाले.