Breaking News

उत्तर प्रदेशमधील अर्ध कुंभमेळ्याच्या तयारीची आदित्यनाथ यांनी केली पाहणी

लखनौ, दि. 05 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इलाहाबाद येथील सर्किट हाऊसमध्ये अर्ध कुंभमेळ्याच्या तयारीची पाहणी केली. संबंधीत  अधिका-यांकडून त्यांनी अर्ध कुंभमेळ्याशी निगडीत सर्व कामांबाबतची माहिती घेतली. कुंभमेळ्याशी निगडीत सर्व कामे सप्टेंबर 2018पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी  यावेळी दिले.
अर्ध कुंभमेळ्यातून देश व जगात उत्तर प्रदेशची प्रतिमा उंचवण्याचे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले. अर्ध कुंभमेळा ही उत्तर प्रदेशला विकसित राज्य म्हणून  नावारुपाला आणण्याच्या दृष्टीने मिळालेली महत्त्वपूर्ण संधी असल्याचे ते म्हणाले.
यासाठी येणा-या भाविकांची सर्व प्रकारची सोय नीट असावी, निवासाची व रुग्णालायाची सुविधा, योग्य उपचार पुरवले गेले पाहिजे असे निर्देश त्यांनी अधिका-यांना  दिले. कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठीच्या प्रस्तावावर त्वरित पाऊल उचलून लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शिवाय  या प्राधिकरणाचे नाव प्रयानगाज मेळा असे ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.