युएई, सौदी अरेबिया, बहरिनने कतारशी राजनैतिक संबंध तोडले
रियाद, दि. 05 - बहरिन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब आमिराती आणि इजिप्त या देशांनी दहशतवादाला पाठिंबा देत असल्याने कतार बरोबरचे राजनैतिक संबंध तोडत असल्याचे आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. हे प्रसिद्धीपत्रक बहरिनकडून प्रसिद्धी करण्यात आले.
कतार दहशतवादाला पाठिंबा देत असून बहरिनच्या अंतर्गत गोष्टींमध्ये लूडबूड करत आहे. कतारमधील सौदी अरेबियाच्या नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी 14 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. दहशतवाद आणि दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ही कृती आवश्यक होती, असे सौदी अरेबियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. देशाच्या सुरक्षिततेला दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांच्या असलेल्या धोक्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याने दिलेल्या अधिकारातंर्गत कतारशी राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे. यानुसार कतारशी जमीन, हवाई आणि समुद्रीमार्गे होणारा संपर्क तोडण्यात आला आहे, अशी माहिती सौदी अरेबियाच्या सरकारी वृत्तसंस्थेकडून देण्यात आली. या सगळ्या घडामोडींनंतर इजिप्त व संयुक्त अरब आमिराती या देशांनीही कतारशी राजनैतिक संबंध तोडल्याचे सांगण्यात येत आहे. कतार हा दहशतवादी संघटनांना पाठिंबा देत असल्याचा आरोप इजिप्तने केला असून कतारमुळे आखाती परिसरात अस्थिरता निर्माण झाल्याचे संयुक्त अरब आमिरातीकडून सांगण्यात आले.