Breaking News

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात 22 जणांचा मृत्यू

बरेली, दि. 05 - उत्तर प्रदेशमधील बरेली येथे बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर बसला लागलेल्या आगीमुळे बसमधील 22 प्रवाशांचा  आगीत होरपळून मृत्यू झाला. 
या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. बसच्या मागील बाजूस असलेला आपत्कालीन
दरवाजा बंद असल्यामुळे अपघात झाला, त्यावेळी प्रवाशांना बाहेर पडता आले नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही बस आनंद बिहारहून गोंडाला  जात होती. ट्रक आणि बसमध्ये झालेल्या अपघातानंतरची ही आग इतकी भीषण होती की, बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेची  माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दरम्यान, या अपघातात राज्य परिवहन मंडळाची ही बस जळून खाक झाली आहे.