Breaking News

अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई

मुंबई, दि. 22 - मुन्नाभाई सीरिजमधील ‘सर्किट’ या व्यक्तिरेखेमुळे प्रकाशझोतात आलेला बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी अडचणीत येण्याची शक्यता आहे.  अर्शदच्या मुंबईतील वर्सोवा परिसरातील बंगल्याचा काही भाग मुंबई महापालिकेने जमीनदोस्त केला आहे. बेकायदेशीरपणे अतिरिक्त मजला बांधल्याप्रकरणी बीएमसीने  सोमवारी अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई केली. या कारवाईत त्याने विनापरवाना बांधलेला मजला तोडण्यात आला. विशेष म्हणजे या अनधिकृत बांधकामाबद्दल  पालिकेला चार वर्षांपूर्वीच माहिती मिळाली होती. पालिका अधिकारी कारवाईसाठी पोहचले, त्यावेळी बंगल्याला कुलूप होतं. त्यामुळे केवळ प्रतिकात्मक कारवाई  करण्यात आली.