Breaking News

नीट परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली, दि. 23 - वैद्यकीय प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट म्हणेजच नीट 2017 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ  सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 12 जून  रोजी नीट परीक्षेचा निकाल 26 जून 2017 पर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज निकाल घोषित करण्यात आला.
देशभरात 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडली होती. यंदा सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यापैकी 10.5 लाख विद्यार्थ्यांनी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये  परीक्षा दिली, तर उर्वरित 1.25 लाख विद्यार्थ्यांनी इतर आठ भाषांची निवड केली होती. यावर्षी नीट परीक्षा 10 भाषांमध्ये घेण्यात आली होती. नीट परीक्षेच्या  माध्यमातून एमबीबीएस आणि बीडीएससाठी प्रवेश होतो.