Breaking News

चीनची दादागिरी, कैलास मानसरोवर यात्रा रोखली

नवी दिल्ली, दि. 27 - चीनने पुन्हा एकदा दादागिरी दाखवता भारतावर डोळे वटारले आहेत. चीनने कैलास मानसरोवर यात्रेचा मार्गच बंद केला आहे. चीनने नाथुला दर्रे रास्ता बंद केल्यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. भारत-चीन सीमेवर सिक्कीम सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांची हाणामारी झाली होती. सोमवारी याबाबतचा व्हिडीओ समोर आला होता.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारताच्या हद्दीतील सिक्कीम सेक्टरमध्ये घुसून दोन बंकर उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या जवानांमध्ये कमालीचा तणाव आहे. या तणावातून चीनने सिक्कीमच्या नाथूला दर्रेपासून होणार्‍या कैलास मानसरोवर यात्रेवरही बंदी आणली आहे. भारतातून कैलास मानसरोवरकडे जाणार्‍या भाविकांचा मार्गही चीनने रोखला. दरम्यान, चीनी सैनिक भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याने भारतीय सैनिकांची डोकेदुखी वाढली आहे.