नाशिक जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस
नाशिक, दि. 04 - गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या नाशिक शहरात आज अखेठ्या गारांसह वादळी पाऊसाने हजेरी लावली. दुपारी तीनच्या सुमारास वीजांचा कडकडाट आणि गारांसह हजर झालेल्या वरुणराजांमुळे बेसावध असलेल्या नाशिककरांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
अवघ्या काही मिनिटांच्या पावसानंतर रस्त्यावर आणि मैदानांत ठिकठिकाणी पाणी साचले. पाऊस अजूनही सुरूच आहे. शिवाजी स्टेडियम मैदानावर काही युवकांनी या पावसात भिजत मनसोक्त आनंद घेतला.नाशिक जिल्ह्यातही कळवणसह काही भागात आज सकाळी पावसाने हजेरी लावली होती. दरी, मातोरी, मुंगसरे, म्हसरूळ आणि मखमालाबाद रोड परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.
चांदवड तालुक्यातही दुपारी 2.30 वाजे पासून जोरदार पाऊस सुरू आहे. दुपारी तीननंतर पिंपळगाव परिसरात गारांसह पाऊस पडला.दरम्यान यंदा 30 मे रोजीच केरळच्या किनार्यावर दाखल झालेल्या मॉन्सूनची आगेकूच सुरू असून 7 तारखेच्या दरम्यान तो राज्यासह नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.