ओडिशामध्ये पृथ्वी 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली, दि. 03 - ओडिशामधील चांदीपूर येथे स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी मोबाईल लाँचरच्या सहाय्याने पृथ्वी 2 क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 350 किलोमीटरपर्यंत आहे. पृथ्वी 2 क्षेपणास्त्रामध्ये दोन इंजिनांचा वापर करण्यात आला असून 500 ते 1 हजार किलो अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
21 नोव्हेंबर 2016 मध्ये याच ठिकाणी पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र 2003 मध्ये भारताच्या लष्करी दलामध्ये समाविष्ठ करण्यात आले होते.
21 नोव्हेंबर 2016 मध्ये याच ठिकाणी पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र 2003 मध्ये भारताच्या लष्करी दलामध्ये समाविष्ठ करण्यात आले होते.