Breaking News

केंद्राच्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाचा ‘आधार’

नवी दिल्ली, दि. 27 - सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड सक्तीचे करण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेवर स्थगिती आणण्यास किंवा अंतरिम सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत आधार कार्ड किंवा क्रमांक नसलेले नागरिक सरकारी योजनांपासून वंचित राहणार नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या संदर्भात पुढील सुनावणी 7 जुलैला आहे.
केंद्र सरकारच्या ‘आधार’सक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड नसलेल्यांना सरकारी योजनांचा लाभ नाकारू नये, असे आदेश दिले होते. तसेच, याचिकाकर्त्यांचे वकील श्याम दीवाण यांना मध्यान्ह भोजनाच्या मुद्द्याबाबत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र हे पुरावे सादर करण्यास त्यांना अपयश आल्याने सर्वोच्च न्यायालयाने ‘आधार’सक्तीला स्थगिती किंवा हंगामी स्थगिती देण्यात तूर्तास नकार दिला आहे.