Breaking News

महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार

मुंबई, दि. 28 - सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळण्यासाठी सुरु असलेल्या महिलांच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आलं आहे. महिला बचत गटाच्या सॅनिटरी  नॅपकिनवर जीएसटी लागणार नाही, असं आश्‍वासन राज्य सरकारने दिलं. महिलांसाठी आवश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लावल्याने लातूरमधील  विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या छाया काकडे यांच्या नेतृत्वात मागील सहा दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन सुरु होतं.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक महिलांची भेट घेतली. महिला बचत गटाच्या सॅनिटर नॅपकिनवर जीएसटी लागणार  नाही, असं आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं. तसंच शाळा आणि रेशन दुकानांवरही सॅनिटरी नॅपकीन मिळणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी  सांगितलं.