जानेवारी अखेरपर्यंत सिंचन विहिरींची कामे पूर्ण करा - जयकुमार रावल
मुंबई, दि. 04 - समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत रोहयोतर्फे महाराष्ट्रात 2016 -17 या कालावधीत एक लाख 11 हजार 111 सिंचन विहीर बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 23 हजार82 विहिरींची कामे पूर्ण झाली असून 77 हजार 336 विहिरींची कामे प्रगतीपथावर आहे. जानेवारी 2018 पर्यंत विहिरी बांधण्याचे हे उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी आज अधिकार्यांना दिले. मंत्रालयात आज समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मजूरांना ऑनलाईन पद्धतीने वेळेवर वेतन मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असून तत्काळ याबाबत पावले उचलले जातील, अशी माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी बैठकीत दिली.
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरी, अमृत कुंड शेततळी, कल्पवृक्ष फळबाग लागवड, अंकुर रोपवाटिका, निर्मल शौष खड्डे, शौचालय, नंदनवन वृक्ष लागवड या सह विविध योजनांची सद्य स्थितीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, उपसचिव प्रमोद शिंदे यांच्यासह विभागीय आयुक्तालयातील सर्व मनरेगा उपायुक्त आदी उपस्थित होते.
सिंचन विहीर बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य शेतकरी आता ठरवून दिलेल्या दरानुसार स्वतः खरेदी करू शकणार आहे. वस्तू घेतल्यानंतर टिन नंबरचे बिल घेऊन ते जमा केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. यामुळे दलालीला आळा बसून शेतकर्यांना तत्काळ मदत मिळणार आहे. शेतकर्यांना तात्काळ पैसे मिळाल्यास काम जोमाने होतील व योजना यशस्वी होईल असे मत मंत्री श्री रावल यांनी यावेळी मांडले.टीन नंबरची पावती मिळणार्या दुकानांची यादी त्यासाठी प्रसिद्ध् केली जाईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, विहिरींच्या कामसंदर्भात दर महिन्याच्या 25-30 तारखेपर्यंत विविध विभागांच्या बैठकी घेऊन आढावा घेण्यात यावा. अशा सूचनाही श्री. रावल यांनी अधिकार्यांना दिल्या. तसेच रोहयोअंतर्गत शासनाकडून अनुदान घेऊन विहीर बांधणार्या शेतकर्यांना कृषी पंपासह इतर योजनाचा लाभ द्यावा, अशी चर्चा कृषी विभागाशी सुरु आहे. लवकरच यावर निर्णय होईल अशी माहिती, मंत्री श्री रावल यांनी दिली.