5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन सोहळा
मुंबई, दि. 04 - जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त पर्यावरण विभाग आणि महाराष्ट प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्यास पर्यावरण मंत्री रामदास कदम, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तर, मुख्य सचिव सुमित मल्लिक आणि पर्यावरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सतिश गवई हे विशेष अतिथी तर, महाराष्ट प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.
या सोहळ्यास वसुंधरा पुरस्कार 2017, पर्यावरण विषयक वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धा आणि फोटोथॉन 2017 च्या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. याचबरोबर जलसंवर्धन पंचायत - एक लोकचळवळ यासाठी विशेष कार्य केलेल्या निवडक गावांचा गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट प्रदुषण नियंत्रण मंडळ व जंगल कँप यांच्या संयुक्त विद्यमाने अंध विद्यार्थ्यांकरिता प्रथमच ब्रेल लिपीमध्ये पर्यावरण विषयक माहिती देणा-या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून राज्यातील औद्योगिक आस्थापनांकरिता स्टार रेटींग योजनेचा शुभारंभ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामुल्य असून, पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पर्यावरण विभागातर्फे करण्यात आले आहे.