Breaking News

संगमनेरचे बसस्थानक आधुनिक सर्व सुविधांयुक्त होणार- आ. थोरात

संगमनेर, दि. 24 - नव्याने अद्यावत होत असलेले बसस्थानक हे विकासाच्या दृष्टीने संगमनेरच्या वैभवाचे पाऊल आहे. हे बसस्थानक हायटेक असून येणार्‍या 50 वर्षांचे नियोजन करुन हे बसस्थानक बांधण्यात येत आहे. सर्वसुविधांयुक्त असलेले हे बसस्थानक निश्‍चितपणे राज्यासाठी मॉडेल ठरेल  असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
नव्या बसस्थानकाच्या कामाची पाहणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.  यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. हर्षल तांबे, अजय फटांगरे, भाऊसाहेब कुटे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, विश्‍वास मुर्तडक, जयवंत पवार, किशोर पवार, गजेंद्र अभंग, रामहरी कातोरे, बी. आर. चकोर, श्याम भडांगे, सतिष आहेर, नवनाथ अरगडे, संतोष हासे, किशोर टोकसे, एस. टी. महामंडळाचे अमोल बनकर, पी. एस. देवकर, योगेश दिघे, साजिद पठाण, बाळासाहेब गोसावी, निखील कातोरे, गणेश गुंजाळ आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ. थोरात यांनी सर्व विभागांची पाहणी करुन सुचना केल्या.
या नव्या होणार्‍या बसस्थानकामध्ये अत्याधुनिक भव्य पार्किंग व्यवस्था, शॉपींग मॉल, हॉटेल सुविधा, बसस्थानकामध्ये प्रतीक्षालय, सुसज्ज टॉयलेट व्यवस्था, बस डेपो व बसस्थानक परिसरात कॉक्रेटीकरण, पेव्हीग ब्लॉक अशा अत्याधुनिक सुविधांसह शहराच्या वैभवात भर टाकणारी सर्वसुविधांयुक्त असे नवे हायटेक बसस्थानक लवकरच कार्यन्वित होणार आहे.
यावेळी आमदार थोरात म्हणाले, शहरात बायपास, प्रवरा नदीवर विविध पूल, जुन्या पुलास नवीन समांतर पूल, अद्यावत तहसील इमारत, प्रांत कार्यालय,नगरपालिका, पंचायत समिती ही वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहे. एसटी महामंडळ व विद्युत महामंडळ जनसामान्यांचे जिव्हाळ्याचे आहेत. एसटीने खर्‍या अर्थाने गोरगरिबांची सेवा केली आहे.नव्याने होत असलेले बसस्थानक हायटेक असून येणार्‍या 50 वर्षांचे नियोजन करुन ते बांधण्यात येत आहे. सर्वसुविधांयुक्त असलेले हे बसस्थानक निश्‍चितपणे राज्यासाठी मॉडेल ठरेल असा विश्‍वास ही त्यांनी व्यक्त केला.
आमदार डॉ.तांबे म्हणाले, आ. थोरात हे विकासाचे दृष्टी असलेले नेते आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यातून मॉडेलरुपी बसस्थानक संगमनेरात होणार आहे. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांसाठी ही चांगल्या सुविधा मिळणार आहे.  हे बसस्थानक सर्व सामान्यांसाठी विविध सुविधा देणारे मध्यवर्ती ठिकाण असणार आहे.यामध्ये प्रवशांसाठी सर्व सुविधा आधुनिक असल्याचे ही ते म्हणाले. यावेळी नागरिक, युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.