Breaking News

कोपर्डीप्रकरणी मुुख्यमंत्र्यांसह 6 जणांच्या साक्षीवर दि.7 रोजी निर्णय.

। घटनेतील तिन्ही आरोपींचे जबाब पूर्ण । पत्रकारांना बसण्यास दिली परवानगी 

अहमदनगर, दि. 24 - कोपर्डी अत्याचार व हत्याप्रकरणातील आज तिसरा आरोपी  नितीन  भैलुे  याचा  जबाब नोंदविण्यात येवून आपल्याला या गुन्ह्यात गोवले गेल्याचा  जबाब त्याने दिला आहे. जबाबानंतर त्याला न्यायालयाच्या आवारात आश्रू आवरता आले नाही. तर दुसरीकडे  आरोपी भैलुे यांचे वकील प्रकाश अहिरे यांनी या घटनेत वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याचे मुख्यंमंत्री देवेंद्र  फडणवीस व एका वृत्तपत्राचे संपादक पवार यांची साक्ष  घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून न्यायालयाने यासंदर्भात पुढील सुनावणी दि. 7 जुलै रोजी ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधिश सुवर्णा केवले यांनी  दिले आहेत. दरम्यान या घटनेतील सर्व आरोपींचे जबाब पूर्ण झाले असून  काल आणि आज दाखल केलेल्या बचाव पक्षाच्या साक्षीबद्दल पुढील तारखेला  सुनावणी  होणार आहे. 
कोपर्डी घटनेसंदर्भात जिल्हा न्यायालयात खटला सुरू आहे. आजच्या तिसर्‍या दिवशी या घटनेतील क्रमांक तिनचा आरोपी नितीन भैलुे याचा जबाब नोंदविण्यात आला. यावेळी न्यायालयाने आरोपीला तुझ्याविरोधात साक्ष दिल्या आहेत ते  तुझ्या विरोधात का बोलतात असे  विचारले  यावर  आरोपीने   या  घटनेतील आरोपी क्रमांक एक पप्पु शिंदे व आपले नाते आहे. आपल्याला या घटनेत जातीवादाच्या नावाखाली  गोवण्यात आले आहे. साक्षीदाराने तु मोटारसायलकलवर  गेला  होता असे सांगितल्याचे न्यायालयाने विचारल्यावर दिलेली साक्ष खोटी आहे. वास्तवित पाहाता जे साक्षीदार मी कधीच पाहिले नाही अशांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. मी कधीच गावाकडे राहत नाही. मी शिक्षणानिमित्त पुण्याला आहे. असे सांगून या घटनेनंतर पोलिस विभागात काही अधिकार्‍यांची बैठक होवून काही विषय झाले असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. या कटात मला गोवण्यात आले असून त्यावेळेला मला या खटल्यातून वगळावे म्हणूून तशी चर्चा झाली होती.  पण पोलिस यंत्रणेवर दबाव व स्थानिक तसेच जातीय विषय घेवून आपल्याला वगळण्यात आले नाही असे त्यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. आपल्याला सुरूवातीला फक्त चौकशीसाठी तीन वेळेला बोलावले होते, तिन वेळेला चौकशी साठी आलो होतो पण नंतर पुढच्या चौकशीला येणार असल्याचे सांगितले असताना पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले व या गुन्ह्यात गोवले गेले असे  त्यांनी जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी आमची चौकशी करून दातांचे ठसे घेतले होते. आम्ही मुुंबई येथे नार्कोटेस्टला सुध्दा गेलो होतो. आमचे ब्रेनमॅपिंग सुध्दा करण्यात आले. पण रिपोर्ट हे पोलीसांच्या तपासाच्या दोषारोप पत्रात कोठेही या संदर्भातील नकलेचा उल्लेख नाही. वास्तविक पाहाता आपल्यावर या घटनेमुळे मोठे नुकसान झाले आहे. असे त्यांनी जबाबात सांगितल्यानंतर आरोपीला न्यायालयात आपले आश्रू अनावर झाले.
या घटनेसंदर्भात आरोपी भैलुेमेचे  अ‍ॅड. प्रकाश  आहेर यांनी न्यायालयासोर काही बाबी उघड केल्या घटना घडल्यानंतर अनेक ठिकाणी वृत्त प्रसिध्द झाले काही वाहिन्यांवर मुलाखती प्रसारित करण्यात आल्या , राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीत जे वक्तव्य केले, ते एक प्रकारे न्यायालयावर दबाव आणणारे आहे. या मुलाखतीत त्यांनी जे वक्तव्य  केले. यातून घटनेविषयीचा  त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आम्हाला त्यांची साक्ष व ज्यांनी मुलाखत प्रसिध्द केली त्या समुहाचे संपादक  यांच्य विरूध्द  साक्ष घेण्याची मंजुरी मिळावी असा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे.
काल अ‍ॅड.बाळासाहेब  खोपडे यांनी दोन सीडी न्यायालयात सादर करून सहा साक्षीदार आम्हाला घ्यायचे आहेत या संदर्भात  अर्ज दाखल केला होता. त्यावर सरकारी पक्षाचे म्हणणे आज आले नाही. न्यायालयाने या सर्व बाबींवर दि.7 जुलै  रोजी  सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेतील तिनही आरोपींचे जबाब आता पूर्ण झाले आहेत दि. 7 जुलै रोजी सरकारी पक्षाकडून नेमके काय विषय घेतले जातात व अर्जावर आक्षेप कशापध्दतीने घेणार हे स्पष्ट होणार आहे.