Breaking News

गुगलकडून डूडलमार्फत नूतन यांना आदरांजली

नवी दिल्ली, दि. 05 - चार दशकांहून जास्त काळ चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणार्‍या दिवगंत अभिनेत्री नूतन यांना त्यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त गुगलने  डूडलच्यामार्फत आदरांजली वाहिली आहे. 
1936 साली मुंबईत जन्मलेल्या नूतन 70 पेक्षा अधिक चित्रपटांतून काम केले. नल दमयंती या चित्रपटातून त्यांनी बाल कलाकार म्हणून या चित्रपटसृष्टीत पहिले  पाऊल ठेवले. यानंतर हमारी बेटी या चित्रपटातून त्यांनी नायिका म्हणून पदार्पण केले. बंदिनी, कन्हैया, छलिया, अनाडी, पेइंग गेस्ट, मै तुलसी तेरे आंगन की,  बारिश, मंजिल, तेरे घर के सामने आणि सौदागर हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते. नूतन यांना 5 वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले होते. चित्रपटसृष्टीतील  त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपटसृष्टीतील या चमकत्या तार्‍याने 21 फेब्रुवारी 1991 रोजी  या जीवसृष्टीचा निरोप घेतला.