Breaking News

एनआयएचे छापा सत्र दुसर्‍या दिवशीही सुरू

श्रीनगर, दि. 05 - राष्ट्रीय तपास यंत्रणेने दुसर्‍या दिवशीही श्रीनगर आणि जम्मूमध्ये छापे टाकले आहेत. फुटीरतावादी नेत्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय तपास यंत्रणा  कालपासून छापे टाकत आहे. पोलिसांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयाज अकबर यांच्या निवासस्थानी तपास यंत्रणेने आज छापे टाकले. अयाज अकबर हुर्रियत  नेते सैय्यद अली शाह गिलानी यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी दहशतवाद्यांना पुरवण्यात येणार्‍या आर्थिक रसदीच्या पार्श्‍वभूमीवर  काश्मीरमधील 14 आणि दिल्लीतील आठ ठिकाणी छापे टाकले. दिल्ली, हरियाणा आणि काश्मीरमध्ये हे छापे टाकण्यात आले असून यामध्ये हवाला व्यवहार करणारे  आणि फुटीरतावाद्यांच्या घरांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या छाप्यादरम्यान, सुमारे अडीच कोटी रु. रोख मिळाल्याचे वृत्त आहे.