लंडनमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ला, 7 जण ठार
लंडन, दि. 05 - लंडनमध्ये दोन ठिकाणी काल रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 जण ठार झाले असून 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या दोन्ही हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. लंडन ब्रीज आणि बरो मार्केट या दोन ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. पंतप्रधान थेरेसा मे यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले असून आपतकालीन बैठक बोलावण्यात आली आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर लंडनमधील सुरक्षाव्यवस्था चोख करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतल्याचे समजते.
लंडन ब्रीजवर एकाने भरधाव गाडी चालवून पादचारी मार्गावरील लोकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला. या ठिकाणी गोळीबारही करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दुसर्या घटनेत बरो मार्केटमधील एका रेस्तराँमध्ये एका व्यक्तीने चाकूने तेथील महिला कर्मचार्यावर हल्ला चढवला. या दोन्ही घटनांनंतर लंडन ब्रीज आणि बरो मार्केट परिसर रिकामे करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.