चर्मकार महिलेची नग्न धिंड काढणार्यांना फाशी द्या!
बुलडाणा, दि. 08 - उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथील दलितांवरील अत्याचाराचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच पुरोगामी महाराष्ट्रातही त्याचीच पुनरावृत्ती झाली असून बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील चर्मकार महिला राधाबाई उंबरकर यांना गावातील जातीयवाद्यांनी अतिशय क्रूर पद्धतीने मारहाण करुन गुप्तअंगात काठ्या टोचून सदर महिलेची गावातून नग्न धिंड काढली आहे. ही घटना अतिशय निंदणीय असून संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. म्हणून या घटनेतील आरोपींनाफाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन बहुजन समाज पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना 6 जून रोजी देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील राधाबाई उंबरकर ह्या आपला पती व मुलांसोबत राहात असताना दि.3 जून रोजी शेतात काम करण्यासाठी गेले असता संध्याकाळीगावातील गावगुंडांनी त्यांना रस्त्यात अडवून विवस्त्र करुन प्रचंड मारहाण केली. राधाबाई यांनी गावगुंडांना प्रतिकार केला असता घटनेतील प्रमुख आरोपींनी गावातील 50 ते 60 लोकांना फोन करुन बोलावून घेतले आणि सदर महिलेचा विनयभंग करुन गावातून नग्नावस्थेत धिंड काढली. ही घटना मातृतिर्थ जिजाऊंच्या जिल्ह्याला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणात पोलिसांनी 23 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करुन दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
निवेदनावर शरद खरात, बाबासाहेब जाधव(रिपाइं नेते), अनंता मिसाळ, सुधीर गवई, अंबादास घेवंदे, जालंधर इंगळे, अॅड.प्रकाश गायकवाड, शांताराम हिवाळे, संदेश हिवाळे, विजय गवई, आदींच्या सह्या आहेत. निवेदन देतेवेळी बसपाच्या अनेक कार्यकर्त्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.