रिक्षातून 8 महिनांच्या बाळाला बाहेर फेकून महिलेवर केला बलात्कार
नवी दिल्ली, दि. 07 - चालत्या रिक्षातून 8 महिनांच्या बाळाला बाहेर फेकून तीन जणांनी एका 23 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. रिक्षातून फेकलेल्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. गुरूग्राम येथे ही घटना घडली. महिलेने त्या तीन जणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शेजार्यांशी भांडण झाल्यामुळे आपल्या 8 महिन्यांच्या बाळाला घेऊन ती महिला माहेरी जायला निघाली होती. ती आयएमटी चौकात पोहोचली असता तिने एका ट्रकवाल्याकडून मदत मागितली. ट्रक चालकाने छेड काढायला सुरूवात केली असता ती खेडकीदौला टोलनाका येताच उतरली. त्यानंतर ती एका रिक्षात बसली. त्या रिक्षात आधीच तीन तरूण बसले होते. रिक्षात बसल्यावर त्या तीन तरूणांनी छेड काढण्यास सुरूवात केली. महिला आरडाओरडा सुरू करताच तिचे बाळही घाबरून रडायला लागले. त्या तरुणांनी बाळाला महिलेकडून खेचून घेत चालत्या रिक्षातून बाहेर फेकून दिले. यानंतर एका निर्जन ठिकाणी रिक्षा थांबवून महिलेवर सामूहिक बलात्कार केला.