7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर ’मापात पाप’
ठाणे, दि. 27 - पेट्रोल पंपांवर हातचलाखी करुन मापात पाप करणार्यांवर ठाणे क्राईम ब्रांचने सुरु केलेली कारवाई कायम आहे. या कारवाई अंतर्गत महाराष्ट्रतील 7 जिल्ह्यांमध्ये 44 पेट्रोल पंपांवर छापेमारी करण्यात आली. धक्कादायक म्हणजे त्यातील 30 पेट्रोल पंपांवर ‘मापात पाप’ केलं जात असल्याचं उघड झालं. इतकंच नाही तर याप्रकरणी पोलिसांनी रविवारी 6 तंत्रज्ञांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या तंत्रज्ञांनी हातचलाखी करण्यासाठी पेट्रोल मालकांना मदत केली होती.
पोलिसांनी पकडलेले 6 तंत्रज्ञ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यातून अटक केली. अटक केलेल्यांपैकी एक तंत्रज्ञ शिबू थॉमसने एकट्याने 1500 पेट्रोल पंपांवरील मशिनमध्ये छेडछाड केली. राज्यातील 70 टक्के पेट्रोल पंपांवर अशी छेडछाड सुरु असल्याची शक्यता पोलिसांना आहे. आता पोलिस त्यांच्या शोधात आहेत, जे पेट्रोल पंप मालकांना पोलिस कारवाईपासून वाचण्यास मदत करत आहेत.