Breaking News

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी केले ’इस्रो’चे अभिनंदन

नवी दिल्ली, दि. 24 - आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून इस्रोने एकाच वेळी 31 उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम केल्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. इस्रोने आज एकाच वेळी 31 उपग्रह एकाचवेळी अंतराळात सोडून इतिहास रचला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोचे अभिनंदन केले आहे. पीएसएलव्ही-सी38 यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्याबाबत मोदी यांनी इस्त्रोचे अभिनंदन केले आहे. आज इस्त्रोने एकाचवेळी 31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. ही फार अभिमानास्पद बाब असल्याचे ट्विट मोदी यांनी केले आहे.