300 ग्लोबल शहरांच्या यादीत 9 भारतीय शहरांना स्थान
नवी दिल्ली, दि. 04 - जेएलएल कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या 300 ग्लोबल शहरांच्या यादीत 9 भारतीय शहरांना स्थान देण्यात आले आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणा-या शहरांचा यात समावेश करण्यात आला आहे. भारतातील 9 शहरांपैकी दिल्ली व मुंबई या शहरांचा समावेश ग्लोबल टॉप 30मध्ये करण्यात आला असून मुंबईला 17 वे स्थान तर दिल्लीला 22 वे स्थान देण्यात आले आहे. या दोन शहरांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न 26 लाख इतके आहे. मुंबई हे आशियातील पाचवे मोठे शहर असून दिल्ली सहावे मोठे शहर आहे. बंगळुरू, चेन्नई व कोलाकात या शहरांचा समावेश ग्लोबल टॉप 100मध्ये करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, अहमदाबाद व सुरत या शहरांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
