Breaking News

अंगावर घाण पडल्याची बतावणी करून डिकीतून पैसे चोरले

नांदेड, दि. 07 - शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया डॉक्टरलेन भागातील एका स्कुटीच्या डिक्कीतून 70 हजार रूपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले तर नायगाव  तालुक्यातील जिगळा येथील घराचे दार तोडून 40 हजार 500 रूपये लंपास केल्याची घटना गुरूवारच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.
नांदेड शहरातील डॉक्टरलेन परिसरात असणार्या स्टेट बँक ऑफ इंडिया येथील पैसे भरण्यासाठी अमोल भोरगे हा स्कुटीहून 70 हजार रूपये घेऊन आला होता.  अज्ञात तीन आरोपींनी भोरगे यास तुझ्या अंगावर काही तरी घाण पडले आहे. असे सांगून तो जवळ असणार्या हॉटेलमध्ये धुण्यासाठी गेला असता या संधीचा फायदा  घेऊन तीन आरोपींनी संगनमत करून गाडीच्या डिक्कीतील 70 हजार लंपास केले. बँकेच्या सी.सी.टी.व्ही. कॅमरेत फुटेज तपासले असता तीन व्यक्ती मोटार  सायकलवरून जात असल्याचे दिसून आले. याबाबत अमर भोगरे वय 25 रा. काहाळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. पुढील तपास पोउपनि एस.एस. भराटे हे करीत आहेत. तर दुसर्या घटनेत नायगाव तालुक्यातील जिगळा येथील भालेराव कुटूंब हे उन्हाळ्याचे दिवस  असल्याने रात्री सर्व जण जेवण करून घराच्या छतावर जाऊन झोपले होते. रात्रीच्यावेळी अज्ञात आरोपींनी किचनची खिडकी तोडून आत प्रवेश करून घरात  असणार्या बेडरूममधील लोखंडी पेटेतील सोन्याच्या दागिन्यासह नगदी रोखरक्कम असे एकूण 40 हजार 500 रूपयांचा माल लंपास केल्याची घटना सकाळी 6 च्या  दरम्यान उघडकीस आली. याबाबत नितीन नागोराव भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.